कंदर ते सातोली शीव रस्ता वाहतुकीसाठी खुला

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर ते सातोली दरम्यान दोन किलोमीटरचा 15 ते 20 वर्षापासून वादात असलेला शिव रस्ता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी खुला केला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण दुर करुन रस्त्यावरील सर्व खड्डे मुरुम टाकण्यात आला आहे. हा रस्ता खुला केल्यामुळे 500 ते 600 शेतकरी व 200 ते 250 शाळेतील लहान मुले यांचा प्रश्न सुटला आहे. हा रस्ता खुला करणेसाठी केमच्या मंडळ अधिकारी नागटिळक मॅडम व वडशिवणेच्या ग्राममहसूल अधिकारी सायली शिंदे, करमाळा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीजा म्हस्के यांनी परिश्रम घेतले. सकाळी 10.30 वाजता हा रस्ता खुला करण्याचे काम सुरू होऊन रात्री 8.30 वाजता पूर्ण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *