करमाळा (सोलापूर) : पांगरे येथील प्रवीणकुमार पवार हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांची (MPSC) त्यांची पोलिस उपनिरीक्षक (PSI) म्हणून निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. आमदार पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी केम येथील अजित तळेकर, पांगरे येथील पाटील गटाचे समर्थक संतोष पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रवक्ते सुनील तळेकर, विलास पाटील, पोपट वाघमोडे, बिभीषण सोनवणे आदी उपस्थित होते.
पांगरे येथील प्रवीणकुमार पवार यांचा PSIपदी निवड झाल्याबद्दल आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार
