करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराच्या विकास कामासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून ४ कोटी २५ लाख १६ हजार ७७० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी दिली आहे.
नगराध्यक्षा सावंत म्हणाल्या, ‘पालकमंत्री गोरे यांच्या सहकार्याने करमाळा शहरातील विविध विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना, नमो उद्या योजना तसेच हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियानअंतर्गत निधीचा समावेश आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा या दोन्ही योजनांअंतर्गत 4 कोटी 25 लाख 16 हजार 770 रुपये मंजूर झाले आहेत तर नमो उद्या योजनेअंतर्गत 1 कोटीचा निधी मंजूर झाला असून कृष्णाजी नगर येथे उद्यान उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान योजनेअंतर्गत शिक्षणासाठी 50 लाख व आरोग्यासाठी 50 लाख असे एकूण 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुढे बोलताना नगराध्यक्षा सावंत म्हणाल्या निधी प्राप्त करण्यासाठी उपनगराध्यक्ष अतुल फंड यांच्यासह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी सचिन तपसे व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री गोरे यांनी सव्वा चार कोटी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी, चांदगुड गल्ली परिसरातील विकासासाठी ८० लाख तर मेन रोडसाठी दीड कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. पालिकेची सेवा प्रत्येकाच्या दारापर्यंत नेण्याचा मनोदय आहे. नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सावंत यांनी केले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत निधी : सर्व आकडे रुपयात
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा परिसर सुशोभीकरण : 45 लाख 67 हजार 828
- संगम चौक ते महात्मा गांधी पुतळा रस्ता डांबरीकरण : 1 कोटी 49 लाख 31 हजार 988
- चांदगुडे गल्ली येथील अभिमान चांदगुडे घर ते राऊत घर रस्ता काँक्रीटीकरण (भाग ब) : 8 लाख 90 हजार 311
- चांदगुडे गल्ली येथील राऊत घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता काँक्रीटीकरण (भाग अ) : 7 लाख 38 हजार 989
- चांदगुडे गल्ली येथील राऊत घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता काँक्रीटीकरण (भाग ब) : 5 लाख 75 हजार 100
- चांदगुडे गल्ली येथील मांगले घर ते पवार घर रस्ता काँक्रीटीकरण : 9 लाख 99 हजार 562
- चांदगुडे गल्ली येथील मांगले घर ते चांदगुडे घर रस्ता काँक्रीटीकरण : 9 लाख 99 हजार 562
- चांदगुडे गल्ली येथील चिंचकर घर ते समाज मंदिर ते माने घर ते निकम घर रस्ता काँक्रीटीकरण : 9 लाख 99 हजार 562
- चांदगुडे गल्ली येथील विविध परिसरात गटार बांधकाम : 30 लाख 89 हजार 870
- प्रभाग क्र. 1 मध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर 10 सीट शौचालय बांधकाम : 25 लाख 27 हजार 110
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा अंतर्गत निधी
- प्रभाग क्र. 10 मौलाली माळ भागात विविध ठिकाणी गटार बांधकाम (भाग अ) : 43 लाख 83 हजार 59
- प्रभाग क्र. 10 मौलाली माळ भागात विविध ठिकाणी गटार बांधकाम (भाग ब) : 24 लाख 35 हजार 551
- प्रभाग क्र. 10 मौलाली माळ येथे स्त्री- पुरुषांसाठी शौचालय बांधकाम (भाग अ) : 26 लाख 89 हजार 139
- प्रभाग क्र. 10 मौलाली माळ येथे स्त्री- पुरुषांसाठी शौचालय बांधकाम (भाग ब) : 26 लाख 89 हजार 139
