फॅबटेक मल्टीस्टेटचा २१ महिन्यात करमाळ्यात साडेअकरा कोटींचा व्यवसाय

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा येथे फॅबटेक मल्टीस्टेटने २१ महिन्यात उत्कृष्ट काम केले आहे. फॅबटेक मल्टीस्टेटचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून २०२४ ला करमाळा शाखा सुरु झाली होती. ३१ मार्च २०२६ पर्यंत शाखेने उत्कृष्ट काम केले, असल्याचे सांगितले जात आहे. फॅबटेक मल्टीस्टेटच्या एकूण ठेवी ६ कोटी १५ लाख रुपये आहेत. गोल्ड लोन २ कोटी ३२ लाख रुपये आहेत तर इतर लोन ३ कोटी ६ लाख रुपये आहेत. यातून एकुण नफा ३२ लाख १० हजार झाला असून एकुण व्यवसाय ११ कोटी ५३ लाख रूपये झाला आहे. मार्च २०२६ पर्यन्तचा हा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले असून सर्व ठेवीदार व कर्जदार यांच्यासह करमाळा शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे यासाठी योगदान महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *