करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडे येथे हिंदु मुस्लिम एकात्मेच प्रतिक आसलेल्या मलिक साहेब संदल उरुस मोठ्या ऊसाहात साजरा करण्यात आला. संदल मिरवणुक व संध्याकाळी कव्वलीच्या कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले होते. संदल घोडयाच्या मिरवणुकीची सुरवात चांद मुजावर यांच्या निवासस्थानापासुन कारण्यात आली. नारळाचे तोरणे व गुलाबाच्या फुलांची चादर पोलिस पाटील शुसेन पाटील व सरपंच बाळासाहेब आनारसे यांच्या हस्ते अर्पण करून पुज्या करण्यात आली.
यावेळी मिरवणुकीत साई बाॅजो, झाॅकार ब्रास बाॅन्ड, हलकी पथकसह संदल घोडयाची मिरवणुक काढण्यात आली. हिरवे झेडे तसेच फटाक्यांचीआतषबाजी करण्यात आली. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर भक्त गण दर्गा येथे फुलांची चादरअर्पण करीत होते. उरुस कमेटिच्या वतीने मान्यवरांचा सत्कार पत्रकार दस्तगीर मुजावर व सम्मद मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला.
मलीक साहेब दर्गा येथे पाऊस पडावा दुष्काळ परीस्थिती दुर होवी म्हणून सामुहिक नमाज व कुराण पठण करून दुवा केली. पंचकृषीतील भाविक भक्तानी मलिक साहेब दर्गा येथे फुलांची चादर अर्पण करून महाप्रसादचा लाभ घेतला. संध्याकाळी कव्वाली कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जावेद मुजावर, सोहेल मुजावर, जाकिर मुजावर, साहिल मुजावर, आरबाज मुजावर,सम्मद मुजावर ,आजिम मुजावर, शकिल मुजावर, आमिर मुजावर शाहरूख मुजावर जाहीगीर मुजावर, आमजद मुजावर, सुनिलाल मुजावर, सलीम मुलाणी, शब्बीर मुजावर, बशीर मुजावर, ईरफान मुजावर, फायाज मुजावर, रफिक पठाण, फिरोज मुलाणी, जमाल मुजावर, आमिन शिलेमन मुजावर,शफिर मुजावर आदी हिंदु मुस्लिम बांधव ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.