करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. यामुळे प्रभारी तहसीलदार विजयकुमार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता होणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सावडी ग्रामपंचायतीत ११ सदस्य आहेत. त्यातील १० सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. उपसरपंच एकाड हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. या सभेसाठी महादेव येदवते, सागर भराटे, मारुती तळेकर, पूनम ठेंबे, कोमल एकाड, सिंधबाई ठोबरे, कोमल जाधव, रामचंद्र शेलार, शैला जाधव, शशिकला शेळके व महेंद्र एकाड यांना नोटीस देण्यात आली आहे.
दरम्यान सावडी येथील अनेक नागरिकांनी सायंकाळी करमाळा पोलिस ठाणे येथे गर्दी केली होती. येथे शिंदे गटाची सत्ता असून उपसरपंचाच्या विरुद्ध १० सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या ठरवापूर्वीच राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे या ठरावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.