करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे अत्याधुनिक होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी दहा संगणक व सहा प्रिंटर दिले आहेत. याचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) झाले आहे. यावेळी आमदार शिंदे उपस्थित होते. करमाळा पोलिस ठाण्यास संगणकाची गरज होती. त्यासाठी त्यांनी आमदार निधीतून हे संगणक दिले आहेत. उदघाटनावेळी प्रांताधिकारी प्रियंका अंबेकर, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, ऍड. राहुल सावंत आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक गुंजवटे यांच्या कक्षात संगणकाला पुष्पहार घालून हे उदघाटन झाले. यावेळी आमदार शिंदे यांनी नवीन पोलिस ठाणे व पोलिस वसाहत यावरही चर्चा केली.
करमाळा पोलिस ठाण्यास आमदार शिंदे यांच्या निधीतून दहा संगणक
