करमाळा (सोलापूर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना कोट्यावधीची मदत मिळत असून यातून अनेकांचे प्राण वाचण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 170 बांधकाम कामगारांना साहित्याचे व नोंदणीचे पत्र देण्यात आले.
करमाळा बाजार समितीचे सभापती कोण होणार? आतापर्यंत ‘यांनी’ पाहिले आहे काम
यावेळी मानूर पिठाचे गुरुगिरी शिवाचार्य महाराज, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील सावंत, डॉ. संचेत पाल, सुमित चंद्रपुरी, सोलापूर जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्री. डोके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, शिवसेना करमाळा प्रवक्ते ऍड. शिरीष लोणकर, शहर प्रमुख संजय शीलवंत, युवासेना प्रमुख निखिल चांदगुडे, राहुल कानगुडे, सहकार सेनेचे नवनाथ गुंड, श्रीकांत गोसावी, बाळासाहेब करचे, दीपक पाटणे, शिवकुमार चिवटे, अनिल पाटील, राजेंद्र काळे, नागेश गुरव, दादा थोरात, प्रशांत नेटके आदी उपस्थित होते.
उपस्थित बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी दरवर्षी पाच हजार रुपये, घर बांधकामासाठी दोन लाख रुपये, व्यवसायासाठी एक लाख रुपये बिना व्याज कर्ज अशा योजना मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिले आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचे नियोजन रत्ननिधी फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष राजीव मेहता यांनी केले.
अर्बन बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी तिजोरेंचा प्रयत्न! डोके नवीन प्रशासक