करमाळा (अशोक मुरुमकर) : तालुक्यातील कावळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीत आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक अनिल शेजाळ यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) १४ अर्ज दाखल झाले आहेत. शक्तीप्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. करमाळा पंचायत समितीच्या सभागृह परिसरात हालगीच्या कडकडात येत कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले. यावेळी डोक्यावरील पांढर्या टोपीने सर्वांचे लक्ष वेधले.
सरपंचपदासाठी वैशाली शेजाळ, लत्ता शेजाळ यांचे अर्ज आहेत. तर सदस्यपदासाठी तृप्ती शेजाळ, रंपा भीसे, राजेंद्र शेजाळ, हिराबाई शेजाळ, विकास शेजाळ, गजराबाई हाके, सागर हाके, रेणुका पावणे, कौशल्या हाके व तात्याराम पावणे यांनी अर्ज दाखल केले आहेत.