शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करा

Submit the scholarship application on the MahaDBT portal

सोलापूर : शैक्षणिक वर्ष 2023- 24 साठी शिष्यवृत्ती शिक्षण फी, परिक्षा फी या योजनेचे अनुसुचीत जाती, प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण अर्ज व नवीन अर्ज नोंदणी सुरूवात करण्यात आलेली आहे. जिल्हयातील काही महाविद्यालयात उशीरा प्रवेश होणे, उशीरा निकाल लागणे आदी कारणामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. मागसवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंवित राहू नये म्हणून अनु. जाती, विद्यार्थ्यांसाठी 3 ऑक्टोबर 2023 रोजी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी संकेस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी सन 2023-24 मधील शिष्यवृत्तीचे अर्ज मुदतीपूर्वी भरून महाविद्यालयांकडे सादर करावेत. तसेच सदरचे अर्ज संबंधीत महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई सादर करावेत. संबंधीत माहविद्यालयांनी अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी.

तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज भरण्याबाबत जनजागृती करावी. महाविद्यालय स्तरावरील सर्व पात्र अर्ज या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्त वर्ग करावेत. असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *