Krishimaitri panel wins in Solapur District Agricultural Employees Credit Union five year elections

सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख अनिल देशमुख व संजय पाटील (राज्याध्यक्ष कृषी पर्यवेक्षक संघटना महाराष्ट्र राज्यचे) तसेच सचिन जगदाळे, उमेश मोहिते, संदीप गायकवाड, सुनील प्रक्षाळे, सुधीर काशीद तसेच विशाल गावडे यांच्या नेतृत्वाखालील कृषीमैत्री पॅनलला मतदारांनी प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजय (संपूर्ण पॅनल 13 झिरो) दिलेला आहे.

या निवडणुकीमध्ये तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी सर्वश्री देवराव चव्हाण, काशीनाथ राऊत, सतीश कचरे, राजेंद्र भांगे, सचिन फुले तसेच सुहास पोळके, उदय साळुंखे (पतसंस्था चेअरमन), अजिनाथ शिंदे (पतसंस्था सचिव), आत्माचे सत्यम झिंजाडे, अजयकुमार बागल, कृषि सहाय्यक दादासाहेब नवले, ज्ञानदेव खाडे, सचिन सरडे, उमाकांत जाधव, ठकसेन चव्हाण, बाळासाहेब गाडे, ज्ञानेश्वर सरडे, नितीन ठोंबरे, रोहिणी सरडे, सुनील गायकवाड, दीपक ऐहवळे, अमोल भोरकडे, रवींद्र सरसंबी, दत्तात्रेय पांढरमिशे, उल्हास काशीद, शिवाजी चव्हाण, पवन पाटील, रणजीत देडे, दासू राठोड, अशोक राठोड, हनुमंत व संदीप ढोले तसेच लिपिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सुरवसे, रमेश जगताप तसेच शिपाई संघटनेचे दत्तात्रय पोळ, राहुल गोरवे, जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माजी वरिष्ठ अधिकारी वर्ग या सर्वांच्या प्रयत्नाने निवडणुकीमध्ये यश प्राप्त झालेले आहे.

निवडून आलेले संचालक अनिल चव्हाण, सतीश देठे, मधुकर मारकड, धनाजी जाधव, धनराज खोत, नितीन शिंदे, चंद्रकांत जाधव, बाबासाहेब गुंड, जानराव, स्वप्निल साठे, प्रशांत धावणे, महिला संचालक, आशा यादव, प्रतिभा इंगळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केलेली आहे. मागील पाच वर्षात दिलेल्या आश्वासनाची 100 टक्के पूर्ण करणारी राज्यातील एकमेव पतसंस्था असा नावलौकिक मिळवलेल्या संस्थेने येत्या काळात व्याजदर कमी करणे कर्ज मर्यादा वाढवणे इ पतसंस्था संकल्पना राबविणे मतदाराच्या लोकोपयोगी उपक्रम राबविणे असा मनोदय जाहीरनाम्यामध्ये व्यक्त केला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *