करमाळा (सोलापूर) : वीटच्या विकासासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जास्तीतजास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वीटसाठी ८१.५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून विकास कामांचे भूमिपूजन चिवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी बिभीषण आवटे, बाळासाहेब गाडे, उपसरपंच अंकुश जाधव, अशोक ढेरे, देविदास ढेरे, हर्षद गाडे, गजानन भोसले, विशाल गंगे, महादेव जाधव, गणेश ढेरे, जगदीश निंबाळकर, धनसिंग भोंग, कृष्णा ढेरे, समाधान कांबळे, सुभाष जाधव, हेमंत आवटे, आजिनाथ पवार, पोपट गाडे, बाळासाहेब ढेरे, दत्तात्रय गाडे, विश्वनाथ ढेरे, हरी आवटे, आप्पा जाधव, अर्जुन आवटे, अशोक राऊत, जालिंदर गाडे, सुभाष गाडे, संतोष ढेरे, संजय गाडे, दत्तात्रय गाडे, रवी ढेरे, हनुमंत आवटे, मनोज ढेरे, अविनाश गाडे, लहू गाडे, दादा ढेरे, अमोल आढळे, विलास जाधव, आश्रू कांबळे, उमेश गाडे, रवी गाडे उपस्थित होते.
मंजूर झालेल्या कामांमध्ये वीट ते बरडे वस्ती, इनामदार वस्ती ते आढळेवस्ती, राघू चांदणे ते कोंढाबाई चांदणे घर (अण्णाभाऊ साठे नगर) रस्ता, शाळा दुरुस्ती, रेवननाथ मंदिर पत्रा शेड व घाट बांधणी, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, दलित वस्ती स्मशानभूमी सूशोभीकरण, दलित वस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, सुभाष जाधव वस्ती डीपी बसवणे, गाडे वस्ती ते अंकुश ढेरे वस्ती रस्ता यासह इतर कामाचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भगवानगिरी गोसावी यांनी केले.