करमाळा (अशोक मुरुमकर) : करमाळा पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्याबरोबर पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी नागरिकांना पहिल्याच दिवशी तहसील कार्यालय व पोलिस ठाणे येथे नवीन नियम लागू करुन शिस्त लावण्याचे आवाहन केले आहे.
पोलिस निरीक्षक घुगे यांनी स्वतःपासूनच हा नियम लागू केला असून आजपासून तहसीलच्या गेटमधून एकही दुचाकी आतमध्ये जाणार नाही. घुगे यांनी स्वतःची चारचकी गाडी गेटच्या बाहेर उभा केली असून यापुढे सर्व गाड्या बाहेर उभा करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे बेशीस्त वाहन चालकांना शिस्त लागणार आहे. याचे आज सर्वत्र कौतुक केले जात आहे. पोलिस ठाण्यासमोरील सर्व वाहने देखील काढली जाणार आहेत. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातही बॅरीकेट बसवण्यात आले आहेत.