करमाळा (सोलापूर) : ‘देशात हुकुमशाही आहे का?’ असा प्रश्न करत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत यांनी मोदी सरकारविरुद्ध टीकास्त्र सोडले आहे. ‘पोलिस ठाण्यात गोळीबार केला जात असून विकास कामाचे सरकारला काहीही देणेघेणे नाही. फक्त भुल थापा मारून मत घ्यायची हा एक कलमी कार्यक्रम भाजपचा आहे’, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
सावंत म्हणाले, ‘भाजप सरकराच्या काळात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढले आहेत. नेतेमंडळीना ईडीची भिती दाखवली जात आहे. सत्तेचा वापर केला जात आहे’, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला माढा लोकसभा मतदारसंघात विजयी केले जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
करमाळा येथे नालबंद मंगल कार्यालय येथे महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची आज (रविवारी) बैठक झाली. यावेळी करमाळा विकास सोसायटीचे अध्यक्ष मनोज गोडसे, काँग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष हनुमंतराव मोरे, माण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय जगताप, माण येथील संजय जगताप, शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख संजय शिंदे, ऍड. गोवर्धन चवरे, शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी शहरप्रमुख प्रविण कटारिया, जिल्हा उपप्रमुख शाहुदादा फरतडे, हरीभाऊ मंगवडे, फारुक जमादार, ऍड. सविता शिंदे, नलिनी जाधव, आझाद शेख, देवा लोंढे, माजी नगरसेवक संजय सावंत, रवींद्र कांबळे, दीपक सुपेकर, गोविंद किरवे, एल. डी. कांबळे, संदीप शेळके, सौदागर जाधव यांच्यासह शिवसेना ठाकरे गट, युवा सेना, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) व काॅग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इसाक पठाण यांनी केले तर आभार फारुक जमादार यांनी मानले.