करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव येथे 87 लाखाच्या विविध विकासकामांचे उदघाटन आज (रविवारी) झाले. जिल्हा नियोजन समितीचे (डीपीसी) सदस्य ऍड. राहुल सावंत यांचे हस्ते हे उदघाट्न झाले. आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक मांगी ग्रामपंचायतचे सदस्य सुजित बागल, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, भोसेचे माजी सरपंच भोजराज सुरवसे, वडगावचे माजी सरपंच नामदेव शेगडे उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डीपीसीचे सदस्य महेश चिवटे यांच्या प्रयत्नातुन रोहयो अंतर्गत दक्षिण वडगाव येथील समाज मंदिर ते रघुनाथ शिंदे घर रस्ता 10 लाख तर उत्तर वडगाव येथे जम्मु पठाण घर ते सुरेश भांडवलकर घर रस्ता काँक्रेटीकरण 10 लाख असा 20 लाख उपलब्ध झाले आहेत.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून उत्तर वडगाव येथे पुनवर रस्ता ते गुंडळी (रोडगे वस्ती) येथील रस्त्यासाठी 20 लाख, पुनवर शिव ते भांडवलकर वस्ती रस्ता खडीकरणसाठी 10 लाख, पुनवर रस्ता ते जगदाळे वस्ती खडीकरण 10 लाख, अल्पसंख्यांकमधुन तळवान वस्ती येथे पाणीपुरवठा सुविधा करणे 7 लाख व दलित वस्तीअंतर्गत सुनील शिंदे घर ते रमेश जोशी घर रस्ता 5 लाख तसेच दक्षिण वडगाव येथे दलित वस्ती अंतर्गत पाणी पुरवठा सुविधा करणे 5 लाख असा 57 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे.
सरपंच बळीराम काळे, उपसरपंच अजित जाधव यांच्यासह सर्व सदस्य यांच्या प्रयत्नाने गावाचा विकास झाला आहे. निधी उपलब्ध केल्याबद्दल आमदार शिंदे व शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वडगाव येथील ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक सीए लहु काळे यांनी आभार मानले.