मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, पुणे, नंदुरबार आणि अमरावती या सात मतदारसंघांचा समावेश आहे.
काँग्रेसने गुरुवारी ५७ जणांची यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ७, गुजरातमधील ११, कर्नाटकमधील १७, राजस्थानमधील ६, तेलंगणामधील ५, पश्चिम बंगालमधील ८, आंध्र प्रदेशमधील २ तर पँडेचेरीमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीत कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराज, पुणे मतदारसंघात रविंद्र धंगेकर, नंदुरबार मतदारसंघात गोवाल पाडवी, सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे, लातूर मतदारसंघात शिवाजी कालगे, नांदेड मतदारसंघात वसंत चव्हाण व अमरावती मतदारसंघात बळवंत वानखेडे यांचा समावेश आहे.