(अशोक मुरूमकर)
माळशिरसमध्ये कोणाला काहीही वाटत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर वातावरण बदलेल आणि भाजपच्या उमेदवाराला २५ हजार मताचा लीड मिळेल, असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
माढा तालुक्यातील वाकाव येथे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरु आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, रश्मी बागल, आमदार बबनदादा शिंदे, चित्रा वाघ, खासदार निंबाळकर आदी उपस्थित आहेत. मंत्री सावंत म्हणाले, माळशिरसमध्ये जे एकत्र आले आहेत. त्यांची पत काय आहे? असे म्हणत धैर्यशील मोहिते पाटील व उत्तमराव जानकर यांना टोला लगावला आहे. माळशिरसमध्ये कोणाला काहीही वाटत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर वातावरण बदलेल आणि भाजपच्या उमेदवाराला २५ हजार मताचा लीड मिळेल, असा दावाही आरोग्यमंत्री सावंत यांनी केला आहे. शेवटी माळशिरसमध्ये त्यांना लीड मिळेल असे गृहीत धरले तरी त्याची भर आपण माढा येथून भरून काढू, असेही ते शेवटी म्हणाले आहेत.