माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला असून दुसऱ्या फळीतील कार्यकर्तेही आता कामाला लागले असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होत आहे. वंचितचे रमेश बारस्कर यांचाही प्रचार सुरु असून निंबाळकर मात्र स्वतः बॅकफूटवर जाऊ लागले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्तांना थेट मतदारच आम्ही निंबाळकरांना मतदान करणार नाही, असे सांगू लागले आहेत. यातूनच सिने कटाच्या एका गावातून कार्यकर्त्यांना परत पाठवले असल्याची जोरदार चर्चा एका भागात सुरु आहे.
भाजपचे निंबाळकर यांच्यासाठी सुरु असलेल्या प्रचारालाही मतदार प्रतिसाद देत नाहीत, अशी चर्चा सुरु झाली आहे. निंबाळकर यांनी या मतदारसंघात विकास कामे केली नाहीत मग त्यांना आम्ही मतदान का करायचे? असा प्रश्न येथे केला जात आहे. काही ठराविकच लोकांशी त्यांनी संपर्क ठेवला असून जनसामान्य नागरिकांना ते भेटले नाहीत? सिने कटाच्या गावात त्यांनी कोणतेही विकास काम केले नाही, असा आरोप केला जात आहे. आम्ही या निवडणुकीत निंबाळकरांना मतदान करणार नाही, असे थेटच सांगून कार्यकर्त्यांना त्यांनी परत पाठवले असल्याची चर्चा सुरु आहे. आमदार संजयमामा शिंदे, भाजपचे गणेश चिवटे, शिवसेनेचे महेश चिवटे यांच्यावर आमची नाराजी नाही मात्र भाजपला आम्ही मतदान करणार नाही असे आता ते थेट बोलू लागले आहेत. ‘आमच्या गावात निंबाळकर यांनी दिलेले दिवे सुद्धा बंद पडले आहेत’, असे सांगून गावकरी नाराजी व्यक्त करू लागले आहेत. ही चर्चा सध्या रंगली असून हे खरे आहे का? असा प्रश्नही केला जात आहे.