करमाळा (सोलापूर) : देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो. देशामध्ये संविधानाप्रमाणे पारदर्शी कामकाज फक्त भाजपच करू शकतो व त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळू शकेल या भूमिकेतूनच आम्ही दलित महासंघाचा पाठिंबा महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिला असल्याचे दलित महासंघाने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांना दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर अवघडे, तालुकाध्यक्ष दीपक आरणे व शहराध्यक्ष वैजनाथ जाधव यांच्या सहीने पत्र देत पाठींबा दिला आहे. यावेळी मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, भाजपचे प्रांतिक निमंत्रित सदस्य दीपक चव्हाण, खासदार निंबाळकर यांचे समनव्यक श्री. मोहिते आदी उपस्थित होते. यावेळी दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत बागल यांनी केले. या पाठिंबामुळे खासदार निंबाळकर यांचे पारडे माढा लोकसभा मतदारसंघात जड झाल आहे.