Prof Free drinking water tanker launched on behalf of Ramdas Jhol Foundation

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत करमाळा तालुक्यात काही गावात व शहरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु केले आहेत. राजुरी येथे पाणी प्रश्न लक्षात घेऊन सुरु झालेल्या टॅंकरचे उदघाटन दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, राजाभाऊ भोसले व सचिन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे, आबासाहेब टापरे, गणेश जाधव, श्रीकांत साखरे, शरद मोरे, भाऊसाहेब जाधव व राजुरीतील नागरिक उपस्थित होते.

प्रा. झोळ म्हणाले, फाऊंडेशनच्या वतीने मागेल त्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर दिला जाईल. ज्यांना गरज आहे त्यांनी प्रा. रामदास झोळ फाउंडेशन कार्यालयाच्या (९४०५३१४२९६) या नंबर संपर्क साधावा. त्या गावाला टँकर देण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता तालुक्यात एकूण ११८ खेडी व वाडी वस्ती असून काही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फक्त ४३ टँकर मंजूर असून ४५ गावांना पाणी पुरवठा होत आहे, अशी माहिती टंचाई कक्षाचे विकास खंडागळे यांनी दिली आहे.

प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून उरलेल्या गावांना मागेल त्या गावात टँकर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसे मागणीचे प्रस्ताव फाउंडेशनच्याकडे जमा करावेत, असे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *