करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात 20 दिवसात 13 व्यक्ती बेपत्ता झाल्या असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात हरवले असल्याची म्हणून झाली आहे. एकीकडे मुलांची लग्न होत नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवाडीवरून दिसत आहे.
सध्या अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. बेरोजगारी वाढत असल्याने सरकारी नोकरदराला मुली देण्यावर पालकांचा भर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या मुलांचे विवाह करणे हा पालकांपुढे चिंतेचा विषय आहे. त्यात मुलींचे शिक्षण करणे हे देखील पालकांपुढे आव्हान आहे. विवाह जुळवण्याच्या नादात काहीची फसवणूकही झाल्याचे पुढे आलेले आहे, आशा स्थितीत व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र आहे. व्यक्ती बेपत्ता होण्याची वेगवेगळी कारणे आहेत, मात्र मुलगी बेपत्ता झाल्यानंतर समाजात वेगळी चर्चा केली जाते.
करमाळा तालुक्यात मे महिन्यात 20 दिवसात 13 व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या व्यक्तींची हरवले असल्याची म्हणून करमाळा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हरवलेल्या व्यक्तीमध्ये सात व्यक्ती या 22 वर्षाच्या आतील आहेट. त्यात सहा मुली व एक मुलगा आहे. केत्तूर नंबर दोन येथून दोन व्यक्ती हरवल्या असल्याची नोंद आहे.
केत्तूर नंबर २ येथून 3 तारखेला एक मुलगी हरवली होती. पिंपळवाडी येथून 4 तारखेला 65 वर्षाची एक व्यक्ती हरवली. त्यांचे नाव भीमराव परसू जाधव आहे. कोंढेज येथून 7 तारखेला एक मुलगी बेपत्ता झाली आहे. कोर्टी येथून 11 तारखेला 33 वर्षाची एक महिला बेपत्ता झाली आहे. देवळाली येथून 11 तारखेला 24 वर्षाचा एक तरुण बेपत्ता झाला. सुरज ताया वाघमोडे असे त्याचे नाव आहे. पारेवाडी येथून 13 तारखेला एक मुलगी बेपत्ता झाली. करमाळ्यातील एका भागातून एक मुलगी बेपत्ता झाली. याची नोंद 14 तारखेला झाली आहे. याच दिवशी 18 वर्षाचा एक तरुणही बेपत्ता झाल्याची नोंद आहे. सिदधार्थनगर (करमाळा) येथून 16 तारखेला एक व्यक्ती बेपत्ता झाली. अनिल हणुमंत कांबळे (वय 50) असे त्यांचे नाव आहे. साडे येथून 17 तारखेला एक मुलगी बेपत्ता झाली. याची नोंद करमाळा पोलिसात हरवले असल्याची म्हणून झाली आहे. आवाटी येथून 19 तारखेला एक मुलगी बेपत्ता झाली. केत्तुर नं 2 येथून 21 तारखेला 54 वर्षाची एक व्यक्ती बेपत्ता झाली. बाळासाहेब भजनदास खाटमोडे असे त्यांचे नाव आहे. 23 तारखेला जेऊर येथून 43 वर्षाची एक व्यक्ती बेपत्ता झाली. शरद महादेव सोनवणे असे त्यांचे नाव आहे.