Ajinath Shankarao Patil of Bitargaon passed away

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव (वा) येथील अजिनाथ शंकरराव पाटील (वय ९३) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पाश्च्यात चार मुले, तीन मुली व सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १९६७ ते १९७२ दरम्यान उपसभापती म्हणून काम पहिले होते.

बिटरगावचे सरपंच व खरेदी विक्री संघाचे संचालक व बिटरगाव सोसायटीचे अध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी काम केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ शिक्षक व नंतर पोलिस पाटील म्हणून त्यांनी कारभार पाहिला. या अष्टपैलू व्यक्तीमत्वच्या जाण्याने या भागावर शोककळा पसरली आहे. तसेच ते देशभक्त नामदेवराव जगताप यांचे राजकीय सहकारी म्हणून परिचित होते. तसेच ते माजी राज्यमंत्री दिगंबररावजी बागल यांच्या बहिणीचे सासरे होते तसेच करमाळा कृषी उत्पन बाजार समिती करमाळा संचालक कुलदीप पाटील व प्रगतशील बागायतदार महेंद्र पाटील व झोनल ऑफिसर बॅकं ऑफ महाराष्ट्र आंनदराजे पाटील यांचे आजोबा होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *