करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत दुसऱ्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा तालुक्यातून आघाडी घेतली आहे. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहेत. या फेरीत निंबाळकर यांनी माण व फलठणमधून आघाडी घेतली आहे. मताधिक्यात मात्र मोहिते पाटील पुढे आहेत. करमाळा, माळशिरस व सांगोला येथे मोहिते पाटील यांना आघाडी मिळाली आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना २३२८ तर मोहिते पाटील यांना २७९०, माढा विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना ३८६९ तर मोहिते पाटील यांना ५३७०, सांगोला विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना ३२५९ तर मोहिते पाटील यांना ४७९०, माळशिरस विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना २४८२ तर मोहिते पाटील यांना ३९१०, फलठण विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना ४१८२ तर मोहिते पाटील यांना ३७०४ व माण विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना ३८०३ तर मोहिते पाटील यांना ३२०७ मते पडली आहेत. मोहिते पाटील यांना एकूण ४८ हजार १४ तर निंबाळकर यांना ३९ हजार ५६८ मते पडली आहेत.