सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे. भाजपने सुरुवातीपासून ही जागा प्रतिष्टेची केली होती. सातपुते यांना विजयी करण्यासाठी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या होत्या. मात्र येथे भाजपला मोठा फटका बसला असल्याचे चित्र आहे. येथे शिंदे यांना ६ लाख
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर दक्षीण, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा- पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे अतिशय चुरशीचा सामना झाला होता. गेल्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा येथे पराभव झाला होता. त्यापूर्वी त्यांच्या पत्नी उज्जवला शिंदे यांचाही या मतदारसंघात पराभव झाला होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या यशस्वी खेळीने शिंदे विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजया नंतर जल्लोष सुरु झाला आहे. सोलापूर मतदार संघातून शिंदे या 81 हजार मतांनी विजयी झाल्या असून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला आहे.
मतमोजणी सुरु झाल्यापासून काहीवेळी सातपुते हे आघाडीवर गेले होते. तेव्हा निकाल बदलेल अशी शक्यता होती. मात्र शेवटच्या टप्प्यात शिंदे यांनी आघाडी घेतली, पुढे त्या आघाडीवर राहिल्या आणि विजयी झाल्या आहेत. अनेक मुद्द्याने ही निवडणुक गाजली होती. शिंदे यांना ६ लाख ६ हजार २७८ मते मिळाली आहेत. तर सातपुते यांना ५ लाख २४ हजार ६५७ मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे यांना ८१ हजार ६२१ मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे.