Appeal for admission to backward class students in government hostels

सोलापूर : बार्शी येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहांमध्ये 2024- 25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल के. ए. सारंगकर यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत मुलांचे शासकिय वसतिगृह नवीन, गाडेगांव रोड, आयटीआय कॉलेज समोर म्हाडा कॉलनी, बार्शी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह जुने, गाडेगाव रोड, आयटीआय कॉलेजवळ, बार्शी या वसतिगृहाची 2024- 25 या शैक्षणिक वर्षाची वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु करण्यात आलेली आहे. प्रवेशासाठी विनामुल्य् अर्ज वाटप वसतिगृहावर 5 जून 2024 पासुन सुरु झालेले आहेत.

वसतिगृहात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेष, निर्वाह भत्ता, वसतिगृहामध्ये राहण्याची, नाष्टा व दोन वेळेच्या जेवणाची सोय मोफत करण्यात येते. तरी इच्छुक गरजु व पात्र विदयार्थ्यानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही वसतिगृहाचे गृहपाल के. ए. सारंगकर यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *