करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गुळसडी येथे यादोबा तलाव परिसरात बेकायदा मुरूम उपसा करणाऱ्यांवर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी कारवाई केली आहे. यामध्ये दोन जेसीबी व तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्येही भीतीचे वातावरण तयार झाले आहे. गौणखनिजबाबतची तहसीलदार ठोकडे यांची ही पंधरा दिवसातील दुसरी कारवाई आहे.
तहसीलदार ठोकडे यांनी करमाळा तहसीलचा पदभार घेतल्यापासून बेकायदा वाळू व मुरूम काढणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र तरीही काहीजण बेकायदा गौण खनिज उपसा करत आहेत. त्यातूनच गुळसडी येथील मुरूम उपासाची माहिती समजताच तहसीलदार ठोकडे यांनी कारवाई केली आहे. जेसीबी व ट्रॅक्टर त्यांनी ताब्यात घेऊन जप्त केले आहेत.