करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी शुक्रवारी (ता. १४) सकाळी ११ वाजता करमाळा तालुक्यात कुंभेज फाटा येथे नगर- टेंभुर्णी महामार्गावर कुंभेज फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. यावेळी जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाज शहर व तालुका करमाळा यांनी केले आहे.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भामध्ये अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. त्या त्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज करमाळा तालुका यांच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मराठा व बहुजन बांधवांच्या वतीने करमाळा- टेंभुर्णी महामार्गावर कुंभेज फाटा येथे हा रस्ता रोको होणार आहे. तरी सर्व मराठा व बहुजन बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *