करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वर्ग २ जमीनीच्या उताऱ्यावरील पोट खराब नोंदीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा सवलतीसाठी अडचणी येत आहेत. या संदर्भात या क्षेत्राची वहीत नोंद करण्याबाबत रश्मी बागल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मागणी केली आहे. याबाबत संबंधितांना मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या आहेत. दरम्यान कुणबी नोंदी व दाखले मिळण्याची प्रक्रिया गतिमान करून शैक्षणिक प्रवेशासाठीच्या जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी वहिवाटी करत असलेल्या जमिनीच्या सातबारा वर वर्ग दोन व पोट खराब अशा नोंदी असल्याने संबंधित शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यासाठी अडचण होती. अनेक शेतकऱ्यांना यामुळे पिकविमा लाभांपासून वंचित राहण्याची वेळ येत होती. या प्रश्नाबाबत भाजपा महिला प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन महसूलमंत्र्यांना दिले. त्यांनी या संदर्भात मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
रश्मी बागल यांची भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा धडाका लावला असून. तालुक्यातील लोकांच्या विविध अडचणी संदर्भात मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करून या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबरोबरच तालुक्यातील विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न दिग्विजय बागल करत आहेत. या मेळाव्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असून यावरून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या माध्यमातून बागल गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
सध्या सर्वत्र विविध शैक्षणिक प्रवेशासाठी ची प्रक्रिया सुरू असून यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत कुणबी नोंदींची प्रक्रिया ही संथगतीने सुरु आहे दाखले मिळण्यास विलंब होत आहे ही संपूर्ण प्रक्रियाच गतिमान करण्यात यावी तसेच विविध शैक्षणिक प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक असण्याचा नियम विद्यार्थ्यांना जाचक ठरत असून जुन्या नियमाप्रमाणे जातपडताळणी प्रस्तावाच्या पोहोच पावतीवर प्रवेश देत प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राज्य साखर संघाच्या संचालिका भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांनी केली,यावर मंत्री महोदय यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात रश्मी बागल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात निवेदन देऊन ते सोडविण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली चर्चा सकारात्मक झाले असून विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले याची माहिती बागल यांनी दिली आहे.