करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात चुकीचे दावे व आरोप करून बागल गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या या संस्थांची बदनामी विरोधकांनी केली. मात्र आता भाजपच्या माध्यमातून बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांना आपण आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार बागल गटाने वडगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यात केला आहे.
मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, रोडगे तात्या, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर,आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, बाळासाहेब पांढरे, काळे महाराज, सरडे महाराज, प्रितम सूरवसे, संदिप शेळके, अतूल थोरवे, संतोष जगदाळे, संभाजी भांडवलकर, रमेश जोशी, गणेश अंधारे, सतिश अनपट, अजित जाधव, हेमंत रोडगे, प्रविण जोशी, इमामभाई पठाण, विजय रोडगे, बाळासाहेब पवार, विजय रोडगे, नारायण भांडवलकर, ज्ञानदेव पाटील, विशाल जगदाळे, जगदाळे बापू, प्रमोद वारे, सूहास बागल उपस्थित होते.
स्व. दिगंबर बागल मामांवर प्रेम करणाऱ्या माणसांचे एक वैशिष्ट्य आहेत. मातीत उगवून आकाशाला गवसणी घालणाऱ्या कर्तुत्ववान डिगामामा प्रमाणेच ही माणसं देखील सत्ता, संपत्ती, पदे यापेक्षा सर्वसामान्यांच्या हिताच्या विचारावर प्रेम करतात. तो विचार हिच सर्वांना एकत्र आणणारी शक्ती आहे, बागल यांनी यावेळी सांगितले. श्री. रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.