करमाळा (अशोक मुरुमकर) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या कामाला आता गती येऊ लागली आहे. लाभार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्वरीत अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा, असे आवाहन करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.
माझी लाडकी बहिण योजनेचे अॉनलाईन आणि अॉफलाईन फॉर्म भरण्याचे काम सर्वत्र सुरु आहे. कागदपत्रांमध्ये शिथीलता आणल्यानंतर हे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी गर्दी कमी झाली आहे. अनेक गावात अर्जही उपल्बध होत आहेत, त्यामुळे ही प्रक्रीया सुलभ झाली असून अर्ज दाखल केल्यानंतर तत्काळ त्याची प्रत अंगणवाडी सेविकेकडे देण्यात यावी. सर्व अर्ज एकत्रीत आल्यानंतर तालुकास्तरावर याची छानणी करुन पुढील प्रक्रिया करणे सोपे होणार आहे व लाभही मिळेल. ११ तारखेपर्यंत आलेले अर्ज जमा करावेत, असेही त्यांनी सांगितले आहे.