करमाळा (अशोक मुरूमकर) : पोंधवडीतील विवाहित महिलेच्या हत्येचा तपास वेगाने सुरु आहे. १६ जुलैला झालेल्या या हत्येप्रकरणात संशयित आरोपी म्हणून पतीसह सहा आरोपी अटकेत आहेत. सुपारी देऊन ही हत्ये केल्याचे तपासत समोर आले होते. आता सुपारी का देण्यात आली होती आणि यामध्ये आणखी कोण संशयित आरोपी आहेत का? याचा तपास सुरू आहे.
करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथे मंगळवारी १६ जुलैला कोमल बिभीषण मत्रे या महिलेची हत्या झाली होती. याचा तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्याकडे आहे. या हत्येबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांकडून यांचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. पती बिभीषण मत्रे, रोहन प्रदीप मोरे (वय २०, रा. जलालपूर, ता. कर्जत), सुनिल उर्फ काका विष्णू शिंदे (वय ३९), प्रदिप उर्फ दीपक सुनिल हिरभगत (वय ३२, दोघे. रा. भांबोरा, ता. कर्जत), विशाल उर्फ सोन्या परशुराम सवाणे (वय २३, मुळ रा. जाचकवस्ती, बारामती, ता. इंदापूर, सध्या रा. भांबोरा, ता. कर्जत) व ऋषीकेश उर्फ बच्चन अंनिल शिंदे (वय २२, रा. भांबोरा, ता. कर्जत) यांना अटक करण्यात आली.
कोमल व बिभीषण यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. मात्र तीन वर्षांनी पत्नी माहेरी गेली ती पुन्हा नांदण्यास सासरी आलीच नाही. पत्नीच्या वडिलांना पती नांदण्यास का पाठवत नाहीत असे विचारून मारहाण करत होता. याबाबत पोलिसात गुन्हाही दाखल होता. हे प्रकरण न्यायालयात आहे. याचा निकाल काही दिवसात येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पत्नीला पोटगी देण्याबाबत निकाल लागेल असाही अंदाज बांधला जात होता. संपत्तीच्या करणावरूनही त्यांच्यात वाद होते असे सांगितले जात आहे.
पत्नी पतीला मुलांना भेटून देत नव्हती. तिचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यातून पत्नी आपली हत्या करणार असल्याचे संशयित आरोपी पतीच्या कानावर आले होते. तिने माझी हत्ये करण्याच्या आधी मीच तिची हत्ये करेल असे तो काहीजणांजवळ बोलला होता. आणि त्यानंतर त्याने तिच्या हत्येची सुपारी दिली, असे सांगितले जात आहे. याचा आणखी तपास सुरू असून त्याने हत्येसाठी कोणला पैसे दिले? किती व कसे पैसे दिले? याचाही तपास सुरू असून यामध्ये आणखी काही माहिती समोर येईल, असे सांगितले जात आहे. मात्र संपत्ती, अनैतिक संबंध व संशय यातूनच ही हत्ये झाली असल्याचे बोलले जात असून आणखी तपासात काय समोर येईल हे पहावे लागणार आहे.
सुपारी देऊन पतीकडून पत्नीची हत्या! पोंधवडीतील प्रकरणाचा सात दिवसात तपास, सहाजण अटकेत
करमाळा पोलिसांनी मात्र या हत्येच्या तपसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर, जालिदर नालकुल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलिस उपनिरीक्षक श्री. बनकर तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हवालदार अजित उबाळे, मनिष पवार, वैभव टैंगल, सोमनाथ जगताप, तौफीक काझी. गणेश शिंदे, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी यांच्यासह मंगेश पवार, आप्पासाहेब लोहार, अझरूदीन शेख, बालाजी घोरपडे, श्री. डोंगरे, शेखर बागल, हनुमंत भराटे, समीर शेख, आनंद पवार, व्यंकटेश मोरे यांनी तपासासाठी परिश्रम घेतले आहेत.