करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात सरकारी जागेवर बेकायदा अतिक्रमण करून गाळे उभारण्यात आले आहेत. ते अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दत्त मंदिर येथून सुभाष चौक मार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे हा मोर्चा आला. तेथे सभेने या मोर्चाचा समारोप झाला.
करमाळ्यात भवानी नाका परिसरात अतिक्रमण झाला असल्याचा आरोप आहे. या अतिक्रमणाविरुद्ध हिंदू धर्मियांकडून मोर्चा काढण्यात आला. राणे म्हणाले, सरकारी जागेवर अतिक्रमण करून हिंदू धर्मियांना त्रास दिला जात आहे. हिंदू धर्मियांवर होणार अन्याय आम्ही सहन करणार नाही. आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे. आमच्या समाजाला त्रास दिला जात आहे. धारावी व उरण येथील घटनेबाबतीही त्यांनी वाचता केली.
राणे म्हणाले, कुराणमध्ये फक्त अल्ह्हाची भाषा आहे. आज आपली जनसंख्या त्यांना कमी करायची आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. येथे ९० टक्के हिंदू राहतात. मात्र त्यांना हे इस्लाम राज्य तयार करायचे आहे. लव जिहाद व लँड जिहादच्यामाध्यमातून हिंदू धर्मियांना संपवले जात असल्याचे ते म्हणाले. आम्हाला येथे येऊन वातावरण खराब करायचे नाही पण आम्हाला त्रास होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही.
पुढे बोलताना राणे म्हणाले, अन्यायाविरुद्ध आता आवाज उठवला पाहिजे. हिंदूंवर अन्याय होत असेल तर सहन करू नका हे सरकार तुमचे आहे. कायदा कायद्याचे काम करेल, आम्हीही आमच्या पद्धतीने काम करू असे म्हणत त्यांनी थेट इशारा दिला. ‘येथील तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सांगेल, यापुढे कोणत्याही जिहाद्यांला लँड जिहादसाठी मदत केली तर पुन्हा पुन्हा तुम्हाला फोन करणार नाही. मग अशा ठिकाणी तुमची पोस्टिंग करेल ना मग बायकोशीही व नवऱ्याशी बोलणेही होणार नाही. करमाळ्यात जेवढे अतिक्रमण आहेत तेवढे अतिक्रमण काढा नाही तर मी स्वतः बुलडोजर घेऊन येईल’, असे म्हणत इशारा दिला आहे. या मोर्चावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.