करमाळा (सोलापूर) : सीना नदीवरील पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी विषेशबाब म्हणून ४ कोटी ८ लाख ११ हजार ९४४ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला असून पोटेगाव, बिटरगाव श्री, बाळेवाडी व पोथरे येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सीना नदीवर करमाळा तालुक्यात खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा हे कोल्हापूर पद्धतीचे लघु पाटबंधारे आहेत. यामध्ये पोटेगाव बंधारा असूनही उपयोग नव्हता. त्यामध्ये पाणी गळती होतहोती. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जलसंपदा विभागाचे उपसचिव एन. जी. बसेर यांनी याबाबतचा सरकार निर्णय जाहीर केला आहे.

आमदार शिंदे म्हणाले, पोटेगाव बंधारा हा महत्त्वाचा बंधारा आहे. सिंचन बजेटमधून त्याला दुरुस्ती करण्यास निधी उपलब्ध नसल्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांना विस्तार सुधार मधून त्याचा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी केली होती. कार्यकारी समितीच्या १६६ व्या बैठकीत सदर प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन प्रस्ताव नियामक मंडळापुढे मांडण्यासाठी सादर करण्यात आला होता.

जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची बैठक होत नसल्यामुळे विषय प्रलंबित होता. या बंधार्‍याचा फायदा पोटेगाव, बाळेवाडी, पोथरे, बिटरगाव श्री, तरटगाव व निलज या गावांना होणार असून यामुळे ८१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पोटेगाव बंधाऱ्यासाठी २१ एप्रिल १९८१ च्या सरकार निर्णयानुसार २४ लाख ६१ हजार खर्चास प्रशासकीय मान्यता होती. जानेवारी १९८८ मध्ये हे काम सुरू होऊन ऑगस्ट १९९० मध्ये पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्प सिंचन व्यवस्थापन विभागाकडे १९९३ मध्ये हस्तांतरित करण्यात आला होता. तेंव्हापासून हा बंधारा दुरूस्तीच्या प्रतिक्षेत होता.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *