करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडत आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले उजनी धरण भरले मात्र मध्यम प्रकल्प अजूनही भरलेले नाहीत. एकरूख, हिंगणी, जळगाव, मांगी, आष्टी, बोरी हे सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्प अजूनही भरलेले नाहीत.
करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्प कान्होळा नदीवर आहे. या प्रकल्पाचा मांगीसह वडगाव, पुनवर, रावगाव, भोसे या गावांसह पोथरे, निलज, बिटरगावला कॅनलमुळे फायदा होतो. हा प्रकल्प अजूनही भरलेला नाही. या प्रकल्पात सध्या एकूण 30.39 दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील 30.20 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. ही पाणी पातळी 533.97 मीटर आहे. आजचा एकूण पाणीसाठा 10.01 दलघमी म्हणजे 0.35 टीएमसी आहे. टक्केवारीमध्ये हा प्रकल्प 32.52 टक्के भरलेला आहे. म्हणजे आणखी पाण्याची गरज आहे.
हीच का रक्षाबंधनची भेट! बागल गटाला शेवटच्या ‘डीपीडीसी’ला सदस्यपद देऊन भाजपने काय साध्य केले?