In Jategaon Nanvare Shinde were felicitated on behalf of the villagers for being selected as sub-inspectors of police and Dhumal on his retirement

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत जातेगाव येथील अमर ननवरे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी व स्मिता शिंदे यांची पोलिस पाटील म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा व सेवानिवृत्त पोलिस पाटील गोरख धुमाळ पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गावातून भव्य मिरवणूक काढत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय माने, प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपनिरीक्षक रोहित शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपान बनकर, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, इंदापूर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे उपस्थित होते. लक्ष्मण माने, काशिनाथ कामठे, मच्छिंद्र धुमाळ, यशवंत शिंदे, प्रकाश पाटील, सुभाष पवार, जातेगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, तुषार शिंदे यावेळी उपस्थित होते.

तात्यासाहेब शिंदे, रामकिसन धुमाळ, युसुफ शेख, रमेश वारे, भाऊसाहेब धुमाळ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महादेव शिंदे यांनी तर सूत्रसंचालन श्री. घुले व आभार प्रवीण शिंदे यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *