उमरड येथे MPSC तून निवड झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

Police officers selected from MPSC felicitated at Umrad

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेतून निवड झालेली पोलिस अधिकाऱ्यांचा उमरड येथे ग्रामस्थांच्या वतीने झाला. यावेळी पोलिस भरती झालेल्या अन्वर मुलाणी, कय्युम पठाण, मुनाफ सय्यद यांचा सत्कार झाला. करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

माजी सरपंच प्रमोद बदे, तात्यासाहेब सरडे, श्रीमान चौधरी, डी. जी. बदे, साहेबराव मारकड, बापू चोरमले, अनिल सुरवसे, माजी सरपंच संदीप मारकड, देवीदास पाखरे, तात्या मारकड उपस्थित होते. माजी नगरसेवक तांबोळी म्हणाले, ग्रामीण भागात खडतर प्रवास करून पोलिस होण ही मोठी गोष्ट आहे. युवकांनी आदर्श घेऊन शिक्का आणि अधिकारी व्हा व आम्हाला तुमचा सत्कार करायला बोलवा आम्ही उस्मानशेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करु, असे ते यावेळी म्हणाले. माजी सभापती पाटील, प्रा. नंदकिशोर वलटे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन फोजमल पाखरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसुल शेख, इरफान शेख, इसाक शेख, अजित पठाण यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *