करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. उपसभापती शैलजा मेहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर बाजार समितीचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशभक्त कै. नामदेवरावजी जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे चेअरमन बबनराव मेहेर, करमाळा तालुका गटसचिव पतसंस्थेचे चेअरमन अनिल सुरवसे, बाजार समितीच्या माजी संचालिका सुप्रिया सुरवसे, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
करमाळा बाजार समितीत उपसभापती मेहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण
