करमाळा (सोलापूर) : सूरताल संगीत विद्यालयाच्या वतीने ‘सूरताल महोत्सव’ विविध गीतांच्या आणि बहारदार शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने झाला. कोलकत्ता, गुवाहाटी, दिल्ली, आगरताळा, मुंबई येथील कलाकारांनी कथक नृत्य, सत्रीय, भरत नाट्यम, कुचीपुडी, मणिपुरी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. संस्थेचा मानाचा सूरताल जीवनगौरव पुरस्कार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गिरधरदास देवी प्रतिष्ठानच्या संचालिका सुनिता देवी यांना प्रदान करण्यात आला.
सुरताल संगीत विद्यालयच्या वतीने सुर ताल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यशकल्याणी संस्थेचे गणेश करे पाटील, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे, डॉ. श्रद्धा जंवजाळ, डॉ. कविता कांबळे, तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, माजी नगरसेविका संगीता खाटेर, महादेव फंड, अतुल फंड आदी उपस्थित होते.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरताल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली. यावेळी विविध आलेल्या कलाकारांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. संस्थेचा मानाचा सूरताल जीवनगौरव पुरस्कार हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गिरधरदास देवी प्रतिष्ठानच्या संचालिका सुनिता देवी यांना प्रदान आला. कार्यक्रमाची सांगता प्राचार्य बाळासाहेब नरारे यांच्या राग भैरवीने झाली. संतोष पोतदार, दिगंबर पवार, सुहास कांबळे, सतिश वीर, अशोक बरडे, प्राचार्य नागेश माने, बाळासाहेब महाजन, किरणकुमार नरारे, प्रतीक पाटील आदी यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ. अनुराधा शेलार व संध्या शिंदे यांनी तर आभार रेश्मा जाधव यांनी मानले.