तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची बाजी

करमाळा (सोलापूर) : येथील शवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने बाजी मारली आहे.

करमाळा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने 19 वर्ष मुलीच्या संघाने कात्रज येथील कृष्णा इंटरनॅशनल स्कूल संघाला एक डाव राखून पराभूत करून प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय निवड झाली. तर 19 वर्षी मुले संघाने जेऊर संघाला एक डाव राखून पराभूत करून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, तालुका क्रीडा समन्वयक प्रा. राम काळे, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या विद्यालयातून आलेल्या व महाविद्यालयातून आलेल्या संघाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *