The statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be anointed today in Karmala

करमाळा (सोलापूर) : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील घटनेचा निषेध करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आज (गुरुवारी) सकाळी साडेदहा वाजता दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला आहे. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून याचा निषेध केला जात आहे. त्याबद्दल समस्त शिवभक्त करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. छत्रपती चौक करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून या घटनेचा निषेध केला जाणार असून समस्त शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *