नगरपालिकेच्या सेंट्रल स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात

करमाळा (सोलापूर) : नगरपालिकेच्या नाम साधना प्राथमिक विद्यामंदिर नगरपरिषद सेंट्रल स्कूल मुले नंबर एक मध्ये दहीहंडी उत्साहात साजरा झाली. प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे व केंद्र समन्वयक दयानंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यापैकी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

शाळेच्या नयनरम्य व प्रसन्न वातावरणात पहिलेचे बालगोपाळ श्रीकृष्णाच्या रुपात खूपच सुंदर दिसत होते. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी कृष्णाच्या गाण्यावर नृत्याचा आनंद लुटला. शालेय आवारात दहीदंडी सजवून उंचावर बांधली होती. महिला शिक्षकांनी टिपरी नृत्यावर ठेका धरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्या़ध्यापिका सुनंदा जाधव, उपशिक्षक श्री. कोळी, सुनिता उबाळे, सुनिता भैलुमे, धनश्री उपळेकर, आशा अभंगराव, वैशाली जगताप, मंगल गलांडे, सुरेखा अवचर, लालासाहेब शेरे, आश्विनी ठाकरे, गौरव पलिकोंडवार यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *