कृष्णा तुझं हे जाणं कोणालाच नं पठणारं आहे. जाण्याचं तुझं हे वय तरी आहे का? तुझ्याबद्दल सांगणारा पहिला कॉल आला त्याने मन सुन्न झालं. ‘सर कृष्णा गेला’, असा तो विश्वास न बसणारा कॉल होता. तुझ्याबद्दल ‘असं’ ऐकायला मिळेल याची कधी कल्पनाच नव्हती. नियतीशी सुरु असलेली तुझी ही झुंज अपयशी ठरली आहे. अचानकपणे तुझ्या या जाण्याने फक्त दळवी परिवाराचं नाही तर सर्व मित्र परिवार दुःखात आहे. कधीही न भरून येणारे हे दुःख आहे यांची नियतीला तरी कल्पना आहे का?
कृष्णा तु पुण्यात होता. तु आजारी आहे याची कोणाला माहितीही नव्हती. कारण तुझं आजारपण हे एवढे दुःख देईल याची जाणीव कोणाला नव्हती. तुझी सुरु असलेली ही झुंज अपयशी ठरले असे कोणाच्या मनातही आले नाही. तुझ्या जाण्याची माहिती समजली तेव्हा कोणाचाच यावर विश्वास बसला नाही. चालता- फिरता- कष्टाळू कृष्णा असा अचानक जाईल असं कोणाला वाटले नाही. तुझं हे वय आई- वडील- पत्नी- भाऊ- पुतण्या- पुतणी यांना आनंद देण्याचे होते. मित्र परिवारात रमायचे होते. पण नियतीने तुला घेरले… तु याची कोणाला साधी मदतही मागितली नाही?
कृष्णा तु आम्हाला पुन्हा भेटणार नाही यावर अजूनही खरंच कोणाचा विश्वास बसत नाही. तु आहे… तू कामावर असशील… पतु गावात येणार आहेस… आमच्याशी बोलणार आहेस… आमची तु खुशाली विचारशील असं अजूनही वाटतंय रे? कृष्णा आज फक्त तुझ्याबद्दलच गावात चर्चा आहे. फोनवरसुद्धा तुझाच विषय आहे. तुझं हे अचानक जाणे कोणालाच मान्य नाही. कृष्णा तु पुन्हा यावं अशी मनापासून सर्वांची इच्छा आहे…
कृष्णा तूच सांग तुला कोणत्या शब्दात या वयात कशी श्रद्धांजली अर्पण करायची…? तुला असा कोणता आजार होता की तो तुला आजारी पडला आणि घेऊन जाईल?
- अशोक मुरूमकर, बिटरगाव श्री