करमाळा (सोलापूर) : उपनिबंधक सहकारी संस्था गट -अ या संवर्गातील परीविक्षाधीन अधिकारी अपर्णा यादव यांची प्रशिक्षण कालावधीमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा यापदी नियुक्ती झाली आहे. एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रममधील परीविक्षाधिन उपनिबंधक सहकारी संस्था गट – अ यांना लगतपूर्व सहायक निबंधक सहकारी संस्था गट -ब या पदाचा स्वतंत्र पदभार सोपविणे बाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे दीपक तावरे यांनी नुकतेच आदेश पारित केलेले होते.
यामध्ये सहाय्यक निबंधक करमाळा या रिक्तपदी २ सप्टेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीसाठी श्रीमती यादव यांची करमाळा येथे नियुक्ती झाली आहे. यादव आज सहाय्यक निबंधक कार्यालय करमाळा येथे रुजू झाल्या . या प्रसंगी त्यांचा सहाय्यक निबंधक कार्यालय करमाळा , कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा , सर्टिफाईड ऑडिटर्स ,गट सचिव संघटना ,खरेदी – विक्री संघ करमाळाआदींच्या वतीने स्वागत व सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी प्रभारी सहाय्यक निबंधक उमेश बेंढारी ,गट सचिवांचे समन्वयक सचिव बबनराव मेहेर ,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर ,सहाय्यक सचिव रविंद्र उकिरडे ,प्रमाणित लेखापरीक्षक उदय सुरवसे , संजय ठेंगडे ,गट सचिव अनिल सुरवसे आदी उपस्थित होते प्रास्तविक व सूत्रसंचालन अशोक नरसाळे यांनी केले तर आभार विष्णू माने यांनी मानले.