करमाळा (सोलापूर) : चिखलठाणच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बबन सरडे यांची निवड झाली आहे. सरपंच धनश्री गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली आहे. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विकास गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या हस्ते सरडे यांचा सत्कार झाला. ग्रामपंचायत सदस्य हेमंत बारकुंड, उपसरपंच योगेश सरडे, महादेव सरडे, आनंद पोळ, तानाजी पवार, सुदर्शन पवार, धनश्री सरडे, रामचंद्र कळसाईत, वसंत खरात, आबासाहेब मारकड, सुरेश चव्हाण, दिनकर सरडे उपस्थित होते.
चिखलठाणच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सरडे यांची निवड
