करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथील श्री गणेशाचे आज (शनिवारी) सायंकाळी विसर्जन झाले. यावेळी गुलालविरहीत व डीजेविना मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या तालावर तरुणांनी ठेका धरला. मिरवणुकीदरम्यान तरुणांच्या डोक्यावरील फेटे सर्वांचे लक्ष वेधत होते. पोथरे येथे यावर्षी एकच गणपती बसवण्यात आला होता. आज त्याचे विसर्जन करण्यात आले. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन हा उत्सव साजरा करण्यात आला. ट्रॉलीमध्ये श्री गणरायाची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
गुलालविरहीत व डीजेविना पोथरे येथील श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक
