करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील निमगाव ह. येथे दोन गटात वाद झाला आहे. याप्रकरणात १० जणांवर परस्परविरोध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश मधुकर नीळ (वय ४२, रा. निमगाव ह., ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच व नानासाहेब रामदास नीळ (वय ४३, रा. निमगाव ह., ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश नीळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नानासाहेब रामदास नीळ, श्रीकांत रामदास नीळ, श्रीराम रोहिदास नीळ, विक्रम संजय कुंभार (सर्व रा. निमगाव ह.) व शरद पोळ (रा. नेर्ले) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ‘कुठंय तुझा भाऊ, आमच्या विरोधात कलेक्टरांकडे तक्रार करतोय का,’ असे म्हणत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
‘ती’ हाणामारी वाळूवरून! याकडे कोण गांभीर्याने पहाणार का?
नानासाहेब नीळ यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सतीश मधुकर नीळ, गणेश मधुकर नीळ, विश्वतेज सतीश नीळ, दत्तात्रय नाना साळुंखे व एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ‘राजकारणाचा राग मनात धरून’ त्यांनी ही मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवारी (ता. १७) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा वाद झाला आहे. दोघांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.