Karmala closed Marathas and other community members in bike rally Support Jarangs by offering garlands to great men

करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. त्याच्या समर्थनार्थ करमाळ्यात आज (रविवारी) सकल मराठा समाजाने बंद पुकारला. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करत समाज बांधवानी करमाळ्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बाईक रॅलीने जात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दरम्यान करमाळ्यातील मुख्य मार्गाने बाईक रॅली काढत समाजची एकजूट दाखवण्यात आली.

घोषणांनी परिसर दणाणला
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी १० वाजता मराठा समाज बांधव एकत्र आले. यावेळी ‘मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है।’, ‘लढेंगे जितींगे, हम सब जरांगे’, ‘या सरकारचे करायचे काय…’, ‘सर्व राजकीय पक्षांचा धिक्कार असो’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दणाणू गेला.

अशी निघाली रॅली
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जय महाराष्ट्र चौक मार्गे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गायकवाड चौकातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. त्यानंतर किल्ला विभाग येथून लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वेताळ पेठेतून महाराणा पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून तेली गल्लीतून पोथरे नाका येथे जात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर
महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर पोथरे नाका ते एसटी स्टँड अशी रॅली गेली. छत्रपती चौक येथून श्री कमलाभवानी देवीच्या रस्त्याने जात रिलायन्स पेट्रोल पंप व तेथून बायपासने जामखेड चौक, नगर रोड मार्गे मेन रोडने सुभाष चौकात रॅली आली. तेथून राशीन पेठला ही रॅली गेली. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

मुस्लीम समाजासह राजकीय नेत्यांचा बंदला पाठींबा
करमाळ्यात सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला मुस्लिम समाजासह इतर काही समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला. या बंदला राजकीय नेते मंडळींनी व काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठींबा दिला आहे. या बंदमध्ये अनेकजण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दुकाने बंद ठेवून दुकानदारांनीही पाठींबा दिला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *