आमदार शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, राऊत यांचाही सत्कार

MLA Sanjay Shinde distributed ideal teacher award also felicitated BDO Manoj Raut

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून आज (शनिवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे प्रमोशन झाल्याबद्दलही उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री देवीचामाळ येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (शिंदे गट) महेश चिवटे, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, गट शिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, विस्तार अधिकारी मिनिनाथ टकले, नितिन कदम, बापू तांबे, सरपंच सोरटे, यशकल्याणीचे गणेश करे पाटील हे उपस्थित होते.
‘या’ सहा मुद्द्यांवर आमदार शिंदे यांना विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न! सोशल मीडियावर ३ हजार कोटींवरून प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *