करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रा. रामदास झोळ यांची करमाळा विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरु आहे. करमाळ्यासह माढा तालुक्यातील ३६ गावांमधील त्यांचा दौरा सुरु आहे. अपवाद वगळला तर सर्व गावांमध्ये दौरा पूर्ण झाला असून राहिलेल्या गावतही जाणार असल्याचे प्रा. झोळ यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. प्रा. झोळ यांच्यामुळे गावागावात नवीन कार्यकर्त्यांनाही संधी तयार झाली असल्याचे चित्र आहे.
‘या’ सहा मुद्द्यांवर आमदार शिंदे यांना विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न! सोशल मीडियावर ३ हजार कोटींवरून प्रश्न
करमाळा तालुक्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल व भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांचा बागल, माजी आमदार नारायण पाटील यांचा पाटील व आमदार संजयमामा शिंदे यांचा शिंदे हे पारंपरिक गट आहेत. भाजपचे गणेश चिवटे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) संतोष वारे, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे, सावंत गटाचे सुनील सावंत यांचीही नावे तालुक्याच्या राजकारणात चर्चेत असतात. त्यात आता प्रा. झोळ यांच्याही नावाची भर पडली आहे.
आमदार शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, राऊत यांचाही सत्कार
प्रा. झोळ हे करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद लावली आहे. शिक्षणक्षेत्रात त्यांचे काम आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने त्यांचे नाव चर्चेत आले. मकाई कारखान्याकडील थकीत ऊस बिल मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले आंदोलन व गावागावात दिलेल्या बाकड्यांमुळे त्यांचे नाव सर्वत्र पोहचत आहे. त्यांची एक टीम सतत कार्यरत आहे. त्यातून नवीन कार्यकर्ते त्यांच्याकडे सध्या आकर्षित होत आहेत. मात्र ते मतदानावेळी काय करतील यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.
माजी आमदार पाटील यांचा जाखले, भोगेवाडीत गावभेट दौरा
गणेशोत्सवाच्या निमित्ता श्री गणेशाच्या आरतीसाठी त्यांना अनेक मंडळांनी निमंत्रित केले होते. आता नवरात्रोत्सवात त्यांनी आराधी गीतांची स्पर्धा ठेवली आहे. सामान्य मतदारांमध्ये त्यामुळे नाव चर्चेत येऊ शकते. त्याचा त्यांना निवडणुकीत किती फायदा होईल हे पहावे लागणार आहे. मात्र निवडणूकपूर्व तयारीत नवखा उमेदवार म्हणून त्यांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. त्यांच्या पत्नी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ या देखील करमाळा मतदारसंघाचा दौरा करत आहेत.