करमाळा (सोलापूर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ञची नियुक्ती झाली आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने ही नियुक्ती झाली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार बदली प्रक्रियेमध्ये करमाळा तालुक्यासाठी परांडा येथील उपजिल्हा रुग्णालयचे डॉ. अंकुश पवार यांची कायमस्वरूपी भूलतज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे सिझेरियन व इतर शस्त्रक्रियेसाठी २४ तास सेवा मिळणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.
Karmala Politics अजित पवारांच्या आवाहनावर भाजपच्या रश्मी बागलांचा पलटवार! मकाईवरून करमाळ्यात राजकारण पेटले
२०१९ ते २४ दरम्यान पूर्णवेळ कायमस्वरूपी भुलतज्ञ करमाळा तालुक्यासाठी लाभला नसला तरीही हंगामी स्वरूपात, कंत्राटी भूलतज्ञ या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले. त्यामधून सुमारे ७०० मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया या उपजिल्हा रुग्णालयामध्ये झाल्या. तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी प्रयत्नशील असून दवाखान्याचे श्रेणीवर्धन करून १०० खाटाच्या रुग्णालयाचे बांधकाम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यातील २० बेड हे अतिदक्षता विभागाचे आहेत. याबरोबरच रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वसाहतीचे बांधकाम वेगात सुरू असून करमाळा तालुका आरोग्य विषयक सुविधांनी संपन्न करणे हेच आपले उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले.